माझं ठाणं. ४० पेक्षा जास्ती वर्षांपूर्वीचं
हा लेख किंवा ब्लॉग लिहायची मुख्य कारण दोन तीन आहेत. परममित्र प्रसाद गांगल यांनी आमच्या मो ह विद्यालयाच्या ग्रुप वर "दिसामाजी थोडे लिहावे", या धर्तीवर "मासामाजि थोडे लिहावे", म्हणजे महिन्यातून एकदा तरी लिहावे, अशी आज्ञा केली. ती तर पाळायलाच पाहिजे. शिवाय असं आहे, की काही महिन्यांपूर्वी भिडे सरांनी अशी उत्तम लेखमाला सुरु केली होती. त्यांनी अचानक थांबवली. एक जुनी गोष्ट आहे. भूगंधर्व रहिमत खान साहेब, हे विष्णुपंत छत्रे यांच्याकडे राहत असत. पण त्यांनी गाणं बंद केलं होतं. त्यावर विष्णुपंतांनी बरोब्बर उपाय शोधला. ते रोज सकाळी तंबोरा लावून वेडेवाकडे गात असत. मग न राहवून रहिमत खान साहेब गायला लागत. त्याचप्रमाणे भिडे सरांना माझा राग येईल, आणि संतापाने ते त्यांचं लिखाण चालू करतील अशी आशा आहे! त्याशिवाय मला स्वतःला चरई मध्ये (तेव्हा) राहण्याऱ्या कमीत कमी ५ ते १० व्यक्ती माहित आहेत, की त्या सुंदर लिहू शकतील! सर्व दोंदे लोकं, शरद गुप्ते हे सहज सुचलेली नावं. त्यापैकी एक व्यक्ती तर (मी नाव सांगत नाही, पण संदीप भागवत ची आई!) अतिशय सुंदर लिहू शकणार आहे. माझं वेडं वाकडं लिखाण बघून...