Posts

Showing posts from January, 2025

आमचे तामरस सर

 आमचे तामरस सर  आमच्या नशिबामुळे आम्हाला नववी, दहावी ,  अकरावी आणि बारावी ला असे शिक्षक लाभले की त्यामुळे आमचं आयुष्य घडलं. चितळे सर, विलास जोशी सर, खोल्लम सर, भिडे सर, पटवर्धन बाई आणि तामरस सर ही अग्रेसर नावं. १० वी ला गणित आणि शास्त्र हे विषय इंग्लिश माध्यमातून शिकवावे हा प्रकार आम्ही ९ वीत असताना अमलात आला. पण अर्थातच एकदम १० वी ला हे अशक्य आहे. म्हणून आठवीपासून सुरवात करायची होती. पण आम्ही नववीत. पण तरीही आम्ही तो पर्याय निवडला. म्हणूनही कदाचित असेल, पण आमच्या बॅच ला शिक्षकांचं प्रेम जास्तीच मिळालं. तामरस सर फिजिक्स आणि गणित शिकवायचे.  तामरस सरांचा अमृत महोत्सव ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते एव्हरग्रीन आहेत. सर म्हणजे शिस्त, सर म्हणजे चटपटीतपणा, सर म्हणजे भराभर आणि परफेक्ट शिकवणं, सर म्हणजे टापटीप. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आदर. फक्त आदर, भीती अजिबात नाही. आजही ते खडू उचलून "assume this is a straight line" असं म्हणून फळ्यावर एक लाईन काढतील आणि शिकवायला सुरुवात करतील असंच वाटतं. ती तथाकथित सरळ लाईन कधीच सरळ आली नाही ही गोष्ट वेगळी! पण assume असं म्हणून स...