Posts

Is Test Cricket Changing? Yes

Is Test Cricket Changing Wow. The Ashes have churned up lot of controversy and talk about test cricket. I was also pulled into the same for some time, having watched two games end in two days.  And mind you, this is not a "doctored" pitch in India. If that was the case then the blame would be put on Indian this, Indian that, subcontinent this and sub continent that. No, this is Ashes, in Australia.  Everyone has expressed opinions. Greg Chappel and bunch of others have put blame on technique. ICC said wicket was unacceptable. So what is reality? I will tell you my opinion, and I am unanimous with myself (taking cue from good old English TV series, Are You Being Served!).  IMO, Test Cricket is changing. People will play attacking cricket. Grafting will not be gone, but restrictive. Even the players doing that will not be like Geoff Boycott, or even Dravid. They will look to attack, but a bit less frequently. Game will change, and adjust. This is a shift that has been going...

Remembering John Madden

Remembering John Madden There are two towering American sports personalities, John Madden and Hank Greenwald. These two folks are solely responsible for arousing my interest in Football and Baseball respectively. Hank, with his dry humor and straightforward way of describing the game got me interested in Baseball. To be sure, the Giants management many times did not like Hank, but he just call spade a spade. For example, he once described an outstanding double play executed by Giants, and coolly said something like this "but when I look at my calendar, it is September, so clearly this play would have helped a lot few months ago". Giants were pretty bad that year and had long being eliminated from playoffs.  Madden, of course came on KCBS every day at 8.15 AM, and provided us insights every day. The guy was simply amazing. Even for someone like me, who only heard him on radio, and saw him on TV in commentry role, connected with him easily. That was the simple charm he had. He ...
Image
 इंटरनेट कसं चालतं  या पिढीला सांगूनही कळणार नाही की कोणे एके काळी इंटरनेट अस्तितवात नव्हतं. आता नेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि नेट.  "अरे यार नेमका नेटपॅक संपला", "सालं नेट स्लो आहे" इत्यादी उद्गार आपल्या आता परिचयाचे झाले आहेत.  आपल्या पिढीला नेट नसण्याची सवय (पूर्वी तरी) होती. तर हे इंटरनेट म्हणजे काय आहे, आणि ते कसं चालतं याची सहज सोपी ओळख करून द्यावी या उद्देशाने हा लेख लिहिलेला आहे. या लेखात मी सर्वसाधारणपणे टेक्निकल टर्म्स वापरणार नाहीये. फार टेक्निकल टर्म्स वापरल्या तर उगीचच गोष्टी कठीण वाटतात. माझं एक तत्व आहे की नेटवर्किंग मधल्या सगळ्या गोष्टी ट्रॅफिक च्या संदर्भात सांगता येतात. आणि ट्रॅफिक म्हणजे आपला रस्त्यावरचा! नेटवरचं ट्रॅफिक कंजेशन आणि राम मारुती रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम यात फारसा फरक नाही.  तर मुळात अशी गोष्ट आहे की पूर्वी सगळे कॉम्प्युटर्स हे एकमेकांशी जोडलेले नव्हते. युनिव्हर्सिटी ऑफ हवाई मध्ये एक प्रोजेक्ट होता, त्यात या कॉम्पुटरना जोडलं गेलं. आता एकदा हे कॉम्प्युटर्स जोडले गेले की त्यांची पॉवर एकदम वाढते...

पंडितराव बाई

  पंडितराव बाई  हे शीर्षक बघितल्यावर काहीतरी चुकतंय का असं वाटू शकेल! पण नाही. नी गो पंडितराव सर सगळ्यांना माहिती आहेत. ठाण्यामधले जे जुने किंवा नवीनसुद्धा लोक, मुलं आहेत त्यांना नी गो पंडितराव वक्तृत्व स्पर्धा माहिती असतीलच. ही स्पर्धा महाराष्ट्रात सुद्धा माहिती आहे. पंडितराव बाई म्हणजे नी गो पंडितराव यांच्या पत्नी. स्वतः पंडितराव सर म्हणजे अस्सल शिक्षक, शिवाय तापटही. मी स्वतः त्यांना पाहिलं नाही. ते अतिशय लोकप्रिय होते, कडक होते, आदरणीय होते (आणि आहेत) आणि ते शिकवतानाच गेले. एव्हढंच माहिती.  मला पंडितराव बाई माझ्या तिसरीत भेटल्या, आणि नंतर मी आणि माझे वर्गमित्र यांच्या आयुष्याच्या भाग बनून गेल्या. माझे वर्गमित्र म्हणजे मनोज वाकडे, श्रीकांत राजे, दिलीप लोंढे, संतोष ताम्हणे इत्यादी.  आमची शाळा, बेडेकर विद्या मंदिर. बाई तिथे मागेच मांडवीकर वाडीत राहायच्या. आता तिथे "रावण गर्वहर द्विभुज" गणपती मंदिर आहे. बाई अतिशय प्रेमळ, विद्यार्थ्यांविषयी कळकळ, शांत, हसतमुख. त्या रागावलेल्या मला काही आठवत नाहीत.  आमची तिसरी सुटली, चौथी सुटली, मग आम्ही सर्व जण मो ह विद्यालयात गेल...

चारचौघे

  चारचौघे सर्व प्रथम म्हणजे अनिल दादाचं अभिनंदन. पंच्याहत्तरी बद्दल. शिवाय अर्चना वहिनीचं पण. त्याच्या ७५  वर्षात तिचा पन्नास तरी वर्षांचा वाटा आहे. अनिल दादाला सांभाळणं ही कर्मकठीण गोष्ट तिने करून दाखवली आहे!  मी लिहायला बसलो तेव्हा लक्षात आलं की आम्ही चार भाऊ. मी, अनिल दादा, अरविंद दादा, आणि सुनील दादा. अर्थात अरविंद दादा आता आपल्यात नाही. पण त्याची आठवण अपरिहार्य आहेच. त्यांना अप्पा (अरविंद दादा) आणि अण्णा (अनिल दादा) अशी पण नावं होती. माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी मधल्या पिढीचा. त्यामुळे लहान असताना या तिन्ही भावांकडून भरपूर लाड झाले. मला आठवतंय, मला पहिली मस्तानी अनिल दादांनी खाऊ घातली. तीसुद्धा एकदम ऑथेंटिक. सदाशिव पेठ, निंबाळकर तालमीच्या जवळ. त्याचबरोबर माझा पहिला ७०  mm सिनेमा, शोले, तो पण अनिल दादाबरोबर पाहिला. मी जेमतेम शाळकरी, त्यामुळे मी पैसे खर्च करायचा प्रश्नच नव्हता. अनिल दादा नेहेमीप्रमाणे मला स्कुटर वर बसवून नटराज टॉकीज मध्ये घेऊन गेला. आणि इथेच थांब म्हणाला. मी तो पर्यंत बाल्कनीत कधीच बसलो नव्हतो. अर्थात हल्ली मॉल च्या जगात बाल्कनी, ड्रेस स्टॉल, ब...

आमचे तामरस सर

 आमचे तामरस सर  आमच्या नशिबामुळे आम्हाला नववी, दहावी ,  अकरावी आणि बारावी ला असे शिक्षक लाभले की त्यामुळे आमचं आयुष्य घडलं. चितळे सर, विलास जोशी सर, खोल्लम सर, भिडे सर, पटवर्धन बाई आणि तामरस सर ही अग्रेसर नावं. १० वी ला गणित आणि शास्त्र हे विषय इंग्लिश माध्यमातून शिकवावे हा प्रकार आम्ही ९ वीत असताना अमलात आला. पण अर्थातच एकदम १० वी ला हे अशक्य आहे. म्हणून आठवीपासून सुरवात करायची होती. पण आम्ही नववीत. पण तरीही आम्ही तो पर्याय निवडला. म्हणूनही कदाचित असेल, पण आमच्या बॅच ला शिक्षकांचं प्रेम जास्तीच मिळालं. तामरस सर फिजिक्स आणि गणित शिकवायचे.  तामरस सरांचा अमृत महोत्सव ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते एव्हरग्रीन आहेत. सर म्हणजे शिस्त, सर म्हणजे चटपटीतपणा, सर म्हणजे भराभर आणि परफेक्ट शिकवणं, सर म्हणजे टापटीप. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आदर. फक्त आदर, भीती अजिबात नाही. आजही ते खडू उचलून "assume this is a straight line" असं म्हणून फळ्यावर एक लाईन काढतील आणि शिकवायला सुरुवात करतील असंच वाटतं. ती तथाकथित सरळ लाईन कधीच सरळ आली नाही ही गोष्ट वेगळी! पण assume असं म्हणून स...

यमन

माझं एक स्वप्न आहे. ते पूर्वी खूप वेळा साकार झालं आहे, पण तरीही अजूनही ते स्वप्न आहेच  कारण आता ते साकार व्हायची शक्यता कमीच आहे.  पावसाळ्याचे दिवस असावेत. साधारण गुरु पौर्णिमेच्या वेळेचे. साडे नऊचा प्रोग्रॅम. जेवण करून आरामात सगळे लोक यावेत. सभागृहाच्या दारावरच कोणीतरी अत्तरदाणी घेऊन उभं असावं. पानाचं तबक फिरत असावं. त्यात पान, सुपारी, कात, लवंग आणि चुना. बास. आमच्या लहानपणी तंबाखू त्यात नसायची. ती डबी मोठे लोक आपापली ठेवायचे. मी अत्तरही लावून घेत नाही, किंवा पानही खात नाही. अजूनसुद्धा. पण अत्तरदाणी आणि तबक असल्याशिवाय कार्यक्रम होतो हेच पटू शकत नाही.  कोणीतरी तब्येतीत गाणारा गायक/गायिका असावी. तबल्यावर सुंदर ठेका देणारा, नेहेमीचा तबलजी. आणि ट्रबलजी नव्हे! संयत साथीची संवादिनी. छोटा विस्तार करून, विलंबित एकतालातली बंदिश चालू व्हावी. एक सुंदर तुकडा घेऊन तबलजीने सम द्यावी.  आणि शांतपणे यमन चालू व्हावा.  आमच्या लहानपणी हे कित्येक वेळा अनुभवलं आहे. पण आता तो माहौल नाही. कोरोना आत्ता आहे, पण तो जाईल. परंतु त्याही आधी सेक्युरिटी मुळे रात्रीचे कार्यक्रम बंद झाले. अजून...