Posts

Showing posts from March, 2021

भिडे सर

Image
 भिडे सर  स्पष्ट आणि सानुनासिक आवाज, स्पष्ट विचार, शिकवायची अतिशय off बीट पद्धत, विद्यार्थ्यांबद्दल अतोनात  प्रेम म्हणजे आमचे भिडे सर. पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगतो, सुस्पष्ट विचार.  अकरावी बारावी ला त्याच्याकडून शिकलेले धडे इंजिनिअरिंग तर सोडाच, आज पण विसरलो नाहीये.  कुठलीही गोष्टीची क्लॅरिटी हवी असेल तर मी अजूनसुद्धा भिडे सरांची आठवण काढतो. आणि मग आपल्यापुढचा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.  आणखी एक गोष्ट म्हणजे भिडे सरांचा विद्यार्थ्यांबद्दलचा शाळा संपल्यानंतरचा दृष्टिकोन. ते म्हणतात शाळेतून बाहेर पडलात की तुम्ही माझे मित्र आहात. आणि तसेच वागतात. हा माझा आणि इतर सगळ्यांचा अनुभव आहे.  माझे जे काही ब्लॉग्स झाले, ठाण्याबद्दल, शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल... आणि आता मो ह विद्यालयाची ७८ची बॅच जे अनियतकालिक काढणार आहे त्याचा स्टार्टींग पॉईंट म्हणजे भिडे सर.  अजून काय लिहिणार. फार काही लिहिलं तर सानुनासिक स्वरात सांगतील, "दातार, हे लिहिलंस हे खूप झालं, आपलं लिखाण स्वान्तसुखाय असावं".  मासिकाकरता सरांकडून प्रो...

विलास जोशी सर

 विलास जोशी सर  आमचे विलास जोशी सर म्हणजे एकदम रुबाबदार. सरांची प्रत्येक गोष्ट म्हणजे टापटीप या शब्दाची व्याख्याच. सरळच सांगायचं तर सर एकदम हिरो होते. शिकवणं पण अतिशय व्यवस्थित आणि टापटिपीचं. मला अजून त्यांची कडक इस्त्री केलेली पॅन्ट (ती गॅबर्डीनची होती का?) आठवते. ते शाळेत तर होतेच, शिवाय उदय पाध्येंच्या घरी क्लास होता तिथे पण शिकवायचे, आणि नंतर आमच्या काही जणांकरता त्यांनी घरी लायब्ररी चालू केली होती तेव्हा तर घरीच भेटायचे.  पण ही नंतरची गोष्ट झाली.  सुरुवातीला मला वाटतं सर कळव्याला राहायचे. तिथून सायकलनी शाळेत यायचे. तेव्हासुद्धा आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा नसलं तरी सर वळताना हात दाखवणार म्हणजे दाखवणारच. हो आणि त्यावेळेला ठाण्यात चिटपाखरू सुद्धा नसेल अशा वेळा असायच्या. हल्ली मला वाटतं पहाटे ४.०० ते ४.०१ पर्यंत थोडीशी शांतता असते असा  प्रवाद आहे.  नंतर सरांनी उदय पाध्येंच्या (म्हणजे  पाध्ये बाईंच्या) घरासमोर नवीन फ्लॅट घेतला. मग त्यांची सायकल बंद झाली. या नव्या घरात असताना त्यांचं लग्न झालं. मग मुलाला कडेवर घेऊन पुष्कळदा दिसायचे. या नवीन घरातच त्यांची ...