इंटरनेट कसं चालतं या पिढीला सांगूनही कळणार नाही की कोणे एके काळी इंटरनेट अस्तितवात नव्हतं. आता नेट हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. अन्न, वस्त्र, निवारा आणि नेट. "अरे यार नेमका नेटपॅक संपला", "सालं नेट स्लो आहे" इत्यादी उद्गार आपल्या आता परिचयाचे झाले आहेत. आपल्या पिढीला नेट नसण्याची सवय (पूर्वी तरी) होती. तर हे इंटरनेट म्हणजे काय आहे, आणि ते कसं चालतं याची सहज सोपी ओळख करून द्यावी या उद्देशाने हा लेख लिहिलेला आहे. या लेखात मी सर्वसाधारणपणे टेक्निकल टर्म्स वापरणार नाहीये. फार टेक्निकल टर्म्स वापरल्या तर उगीचच गोष्टी कठीण वाटतात. माझं एक तत्व आहे की नेटवर्किंग मधल्या सगळ्या गोष्टी ट्रॅफिक च्या संदर्भात सांगता येतात. आणि ट्रॅफिक म्हणजे आपला रस्त्यावरचा! नेटवरचं ट्रॅफिक कंजेशन आणि राम मारुती रस्त्यावरचा ट्रॅफिक जॅम यात फारसा फरक नाही. तर मुळात अशी गोष्ट आहे की पूर्वी सगळे कॉम्प्युटर्स हे एकमेकांशी जोडलेले नव्हते. युनिव्हर्सिटी ऑफ हवाई मध्ये एक प्रोजेक्ट होता, त्यात या कॉम्पुटरना जोडलं गेलं. आता एकदा हे कॉम्प्युटर्स जोडले गेले की त्यांची पॉवर एकदम वाढते...
Posts
Showing posts from August, 2025