Posts

Showing posts from January, 2021

मला न समजलेली अमेरिका

मला न समजलेली अमेरिका  भिडे सरांनी मला हा विषय सुचवला, म्हणून लिहायचं धाडस करतोय.  एक जुनी गोष्ट आहे, गाणं शिकणाऱ्या बायकोला नवरा सांगतो की तू गाण्याऐवजी पेटी का नाही शिकत. कारण पेटी बेसुरी होत नाही! त्याचप्रमाणे सरांना असंही वाटलं असेल की हा फारच ठाण्याबद्दल लिहितोय तर त्यापेक्षा अमेरिकेबद्दल लिहिलं तर जरा बरं लिहील!  पण जेव्हा मी विचार करायला बसलो, की काय लिहू, तेव्हा मला फक्त मथळा सुचला. "मला न समजलेली अमेरिका". आजकाल एखाद्या महिन्याच्या टूरिस्टी अनुभवावर लेख लिहायची प्रथा आहे. पण ३० वर्ष राहूनही मला अमेरिका समजली आहे का? उत्तर सोपं आहे, "नाही".  माझ्यासारखे लोक जेव्हा येतात, तेव्हा ते प्रामुख्याने शहरात किंवा उपनगरात राहतात. हा एक मोठा बबल आहे. आपण जेव्हा म्हणतो की हिंदुस्थानामध्ये इंडिया आणि भारत असे दोन देश आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत शहरी आणि ग्रामीण असे दोन देश आहेत. शहरी भाग प्रामुख्याने डेमोक्रॅटिक आहे, उरलेला रिपब्लिकन आहे. धर्माचा पगडा भरपूर आहे, विशेषतः ग्रामीण अमेरिकेत. वर्णद्वेष आहेच आहे. त्याच प्रमाण शहरात खूपच कमी आहे, किंवा जवळ जवळ नाहीच. ग्रामीण भ...

७० च्या दशकातलं सांस्कृतिक ठाणं

७० च्या दशकातलं सांस्कृतिक ठाणं  ठाणं शहर हे कायमच सांस्कृतिक होतं आणि आहे. आता गर्दी प्रचंड झाली आहे, चालता येत नाही, वाहनांनी आपण चिरडून जाऊ का, गोखले रोड क्रॉस करायची आजची स्ट्रॅटेजी काय ठेवावी, आज आपण गोखले रोड क्रॉस केलाच नाही तर चालेल का इत्यादी प्रश्न रोजचेच असले तरीही ठाण्याची सांस्कृतिक नाळ कधीच तुटली नाही.  आम्ही शाळेत होतो तेव्हासुद्धा ठाणं सांस्कृतिक रीत्या बहरात होतंच.  अगदी पहिला उल्लेख अर्थातच घंटाळी मित्र मंडळ. ते अजून चालू आहे की नाही ते माहित नाही, परंतु चालू असावं असं वाटतंय. घंटाळी मित्र मंडळाचे अतिशय दर्जेदार कार्यक्रम घड्याळ लावून रात्री ९.३० वाजता चालू व्हायचे. ९.२५ वाजले की, "बहु असोत सुंदर संपन्न की महा, प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा" हे चालू. आणि ९.३० वाजता मुख्य कार्यक्रम. वर्गणी मागायला, आणि नंतर हिशोब/प्रसाद द्यायला जे कार्यकर्ते यायचे ते वर्षानुवर्षे तेच होते, म्हणून ते आमच्याच नव्हे तर सगळ्यांच्या घरातलेच झाले होते. आणि मुख्य म्हणजे सगळी घरं ही lower middle क्लास मधली होती तरी वर्गणी द्यायला  कोणीच खळखळ करीत नसे (आणि कित्येक lower mi...

मो ह विद्यालय

 मो ह विद्यालय  आपल्या शाळेविषयी प्रेम नसलेला माणूस क्वचितच सापडेल. त्यातून माझ्यासारख्याची केस अजूनच वेगळी. मीच नाही, तर आमची १९७८ सालाची बॅच वेगळी होती हे निश्चित. आम्ही सगळे संपूर्णपणे outstanding विद्यार्थी होतो. अतिशय अभ्यासू, प्रामाणिक, कष्टाळू, कामसू, प्रेमळ होतोच. प्रत्येक विद्यार्थी सकाळी ४ वाजता उठून गृहपाठ करीत असे!  असो, आता खरं काय ते सांगतो. आमची बॅच ही गणित/शास्त्र हे विषय इंग्रजी माध्यमातून शिकणारी पहिली बॅच. हा pattern आला तेव्हा आम्ही नववीत होतो. अर्थात तेव्हा दहावीत असलेले विद्यार्थी पण eligible होते. पण एकदम दहावीत हा बदल कुणी केला नाही. आमची बॅच आणि १९७९ ची बॅच या दोन वर्गांनी हा बदल स्वीकारला. त्यातून आम्हाला आठवीच वर्ष न मिळाल्यामुळे शिक्षकांनी खूपच जास्ती मेहेनत घेतली.  सर्वश्री विलास जोशी, तामरस, खोल्लम, भिडे, सुबोध देशपांडे, पटवर्धन बाई या आणि इतर अनेकांनी त्यावेळेला अतिरिक्त वर्ग घेतले. आणि आताच्या जमान्यात हे ही सांगायला पाहिजे की हे अतिरिक्त वर्ग घेताना फक्त विद्यार्थ्यांविषयी तळमळ ही एकच गोष्ट त्यांच्या मनात होती. इतर कुठलाही फायदा, आर्थ...

कालाय तस्मै नमः

 कालाय तस्मै नमः  मी ठाण्याबद्दल जो लेख लिहिला होता त्यावरच्या प्रतिक्रिया माझ्या अपेक्षेच्या बाहेर होत्या. त्यामुळे मी पुढचा लेख लिहिण्याचं धाडस करतोय. आधीचा लेख इथे सापडेल https://www.facebook.com/vivek.datar.1/posts/10217846780832184 किंवा इथे https://www.blogger.com/blog/post/edit/8356575417697978971/38693657072159533 तेव्हाच्या कित्येक खाणा खुणा आता काळाच्या ओघात नाहीशा झाल्या आहेत. सरवट्यांचा बंगला राम मारुती रोड वर होता. आता तिथे मोठी इमारत आहे. हेगड्यांचा बंगला तळ्याच्या कॉर्नर ला होता. तोही नाही. कल्पना केंद्र आता केवळ जुन्या लोकांच्या आठवणीत अस्तित्वात आहे. आईस फॅक्टरी मध्ये खरोखरच आईस मिळायचा. तो घेऊन, आणि आईसक्रीम चा पॉट भाड्याने आणून आईस क्रीम करणे हा उन्हाळ्यातला तीन चार वेळेचा कार्यक्रम असायचा. आता आईस क्रीम सर्रास कुठेही मिळतं. कालाय तस्मै नमः.  मामलेदार मिसळ खरोखरच मामलेदार कचेरीला लागून होती. आता जुनी जागा अजून आहे की नाही हे माहित नाही. ७०च्या सुमाराला बबन सीताराम भागवत यांनी आत्ता जिथे गजानन महाराजांचं मंदिर आहे तिथे बटाटा वडा, सामोसा आणि वडा पाव विकाय...