Posts

Showing posts from July, 2026

वाईन, एक पिणे, नव्हे जाणवणे, नव्हे आस्वादणे

 वाईन, एक पिणे, नव्हे जाणवणे, नव्हे आस्वादणे  नुकताच एक वाईन चा अनुभव घेतला, आणि वाईन पिणे हा किती चुकीचा शब्द आहे हे कळून चुकलं. मला उगीचच वाईन पितात असं वाटत होतं. छे, विवेक, थूत तुझ्या जिनगानीवर.  तर ते षास्त्र असतं. ग्लासात ओतलेली, सॉरी सर्व्ह केलेली वाईन लगेच प्यायली तर तुम्हाला बाहेर घालवण्यात येतं. अगदी काहीच नाही तर गेलाबाजार "ह्यो कोंचा गाववाला हाय" असे लूक्स मिळतातच. आणि आपला सोशल स्टॅटस एकदम खालावतो. म्हणजे अगदी राखी सावंत स्टेट डिनरला गेली तर काय होईल असं  बघायला लागतात.  पण हा पेपर अवघड नाहीये. काही पथ्यं पाळली की बरोबर जमतं.  सर्वप्रथम, ग्लास हाती घ्यावा आणि गरा गरा फिरवावा. याला swirl असा शब्द आहे. मग मान वाकडी करून (हे महत्वाचं आहे, अजिबात विसरू नका) त्याचा वास घ्यावा. त्यानंतर काही कॉमेंट्स पाठ करून ठेवाव्यात.  "एरिएशन मला वाटतं थोडं व्हायला पाहिजे" असं म्हणून थोडा वेळ वाट पाहावी. आपण असं म्हणलं की कोणालाच वाईन पिता (सॉरी जाणवता, सॉरी आस्वादता) येत नाही. ते  खुळ्यासारखे आपल्याकडे बघत बसतात. आपण आसुरी आनंद घ्यावा (आपल्याला काय, कुठ...