भिडे सर
भिडे सर
स्पष्ट आणि सानुनासिक आवाज, स्पष्ट विचार, शिकवायची अतिशय off बीट पद्धत, विद्यार्थ्यांबद्दल अतोनात प्रेम म्हणजे आमचे भिडे सर. पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगतो, सुस्पष्ट विचार.
अकरावी बारावी ला त्याच्याकडून शिकलेले धडे इंजिनिअरिंग तर सोडाच, आज पण विसरलो नाहीये.
कुठलीही गोष्टीची क्लॅरिटी हवी असेल तर मी अजूनसुद्धा भिडे सरांची आठवण काढतो. आणि मग आपल्यापुढचा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.
आणखी एक गोष्ट म्हणजे भिडे सरांचा विद्यार्थ्यांबद्दलचा शाळा संपल्यानंतरचा दृष्टिकोन. ते म्हणतात शाळेतून बाहेर पडलात की तुम्ही माझे मित्र आहात. आणि तसेच वागतात. हा माझा आणि इतर सगळ्यांचा अनुभव आहे.
माझे जे काही ब्लॉग्स झाले, ठाण्याबद्दल, शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल... आणि आता मो ह विद्यालयाची ७८ची बॅच जे अनियतकालिक काढणार आहे त्याचा स्टार्टींग पॉईंट म्हणजे भिडे सर.
अजून काय लिहिणार. फार काही लिहिलं तर सानुनासिक स्वरात सांगतील, "दातार, हे लिहिलंस हे खूप झालं, आपलं लिखाण स्वान्तसुखाय असावं".
मासिकाकरता सरांकडून प्रोत्साहन तर आहेच, पण लेख मिळाला तर नक्की आवडेल
(अ)विवेक
PS : (अ)विवेक हे माझं के एन जोशीबाईंनी ठेवलेलं नाव आहे
भिडे सर कधी भांभावून जात नसत. वर्गात कोणी आक्षेप घेतला तर अत्यंत शांतपणे पुनर्विचार करून उत्तर देत असत. प्रश्न कितीही साधा असो पूर्णपणे शंकानिरसन होणार !
ReplyDeleteभिडेसर आम्हाला शिकवायला कधीच नव्हते. मात्र त्यांच्या गणित शिकविण्याच्या कौशल्याचे गुणगान शाळेतील त्यांच्या हाताखाली शिकणाऱ्या मुलांकडून ऐकत होतो. जरी ते कधीच शिकवायला नसले, तरी शाळेतील आम्हा मुलांसोबत त्यांचा मैत्रीचा व्यवहार होता. त्यामुळे ते आपलेच वाटत राहिले.
ReplyDeleteशाळेतून बाहेर पडून महाविद्यालयात गेल्यावर शाळेच्या माजी विद्यार्थी संघात काम करू लागलो आणि तेथे भिडे सरांचा परिचय वाढला. भिडे सर आणि त्यांची भावंडे आपल्याच शाळेचे माजी विद्यार्थी. शाळेच्या समोरच त्यांचे घर. शाळेच्या माजी विद्यार्थी संघात या तिन्ही भावंडांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचे बंधू अंतर्गत हिशोबतपासनीस होते तर त्यांच्या भगिनी माजी विद्यार्थी संघाच्या उपाध्यक्षा होत्या. सर शाळेतच तेव्हा शिकवीत असल्याने शाळा आणि माजी विद्यार्थी संघ यांच्यातील महत्वाचा दुवा होते.
सर शाळेव्यतिरिक्त बाहेरही अनेक सामाजिक संघटनांसाठी काम करीत असत. आता निवृत्त झाल्यावर तर त्यांनी सामाजिक कार्याला वाहून घेतले आहे. शाळेतील गरजू मुलांना मदत करायला शिक्षकांनी एक संस्था स्थापन केली आहे. सर त्या संस्थेसाठीही खुप काम करीत असतात. ते फेसबुकवरही खूप सक्रिय आहेत. या वयात फेसबुकसारखे नवे तंत्रज्ञान शिकून त्यात सक्रीय राहणे हे खरेच कौतुकास्पद आहे.
एक आठवण. सेवादलात आमचा एक क्रियाशील कार्यकर्ता आपल्याच शाळेचा माजी विद्यार्थी. तो नेहमी भिडे सरांची आठवण सांगतो. भिडे सर त्यांच्या घरी गणपतीसमोर जी दक्षिणा जमत असे ती त्याला त्याच्या शिक्षणासाठी देत असत. त्याचे शिक्षण असेच पार पडले.
विवेक, आज तू भिडे सरांबद्दल लिह्लेस त्यामुळे आनंद झाला. भिडे सरांना आरोग्यपूर्ण भरपूर आयुष्य लाभो ही परमेश्वराकडे प्रार्थना.
आदर्श शिक्षक आणि फर्डा वक्ता म्हणून भिडे सर माझ्या हृदयात आहेत.वाचनाचा प्रचंड व्यासंग आणि ज्ञानपिपासू वृती यामुळे ते कायम आपल्या विषयात update राहत.सरांच्या स्मरणशक्तीला तर तोड नाही.कोणताही प्रसंग ,आठवण ते जशीच्या तशी सादर करतात. स्पष्टवक्तेपणा असल्याने फापटपसारा तिथे असतच नाही.जे आहे ते स्पष्ट बोलून मोकळं होतात वर त्या बद्दल जाहीर माफी ही मागून टाकतात.
ReplyDeleteसलग ३४ वर्षे त्यांनी मोह विद्यालयात सेवा केली.शाळेचा कोणताही कार्यक्रम असो,प्रास्ताविक किंवा आभार प्रदर्शन त्यांच्या इतके नेमक्या शब्दात कोणी करूच शकत नव्हते.आलेल्या पाहुंण्याची ओळख तर भिडे सर,हातात एकही कागदाचा चिटोरा न घेता करत तेव्हा आम्ही थक्क होत असू.
शाळेतील माजी विद्यार्थी संघाचे आणि अभिरुची मंडळाचे काम अनेक वर्ष जबाबदारीने केले.
रामकृष्ण मिशन चे ते सदस्य असून,विरार जवळलील सकवरा येथे गरिबांच्या उपचारासाठी जे नामवंत डॉक्टर्स जातात त्यांचे सहाय्यक म्हणून त्यांनी काम केले.तसेच तेथील शिक्षण संस्थेतील विद्यार्थांना विनामूल्य गणित ही शिकवले.
एरवी कंटाळवाण्या ,रुक्ष आणि भीती दायक विषयाची आवड विद्यार्थांच्या मनात निर्माण करण्याचे अवघड काम सरांनी केले यात शंकाच नाही.