Posts

MH Blog Trial

Image
 

पटवर्धन बाई

 पटवर्धन बाई  त्यांचा विषय बायोलॉजी. मला पहिली संधी मिळाल्या मिळाल्या मी तो सोडला! अर्थात तो त्यांच्यामुळे नव्हे. कारण त्यांचं शिकवणं होतं म्हणून पासापुरते मार्क मिळू शकत होते. परंतु सेल, बेडूक (पुलंचे  रावसाहेब जसा प्राचीला गच्ची शोधत होते, त्याप्रमाणे बेडूकला हाडूक हे यमक बरोबर जमेल!), मेम्ब्रेन, प्लाझ्मा, मायटोकोण्ड्रिया, न्यूक्लिअस  आणि अनंत न कळणाऱ्या गोष्टी या विषयात होत्या. यात आपण काहीही करू शकणार नाही (नापास होणं मात्र जमेल) ही खात्री पटल्यामुळे मी मुकाटपणे टेक्निकलला प्रवेश घेतला.  त्यांचा विषय सोडल्यामुळे असेल कदाचित, पण मी त्यांचा आवडता होतो हे निश्चित.  अतिशय हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. शिकवायची उत्तम हातोटी, चपखल उदाहरणं आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद म्हणजे पटवर्धन बाई. मला आठवणारी एक गोष्ट म्हणजे पिरिअड संपताना बाई अवांतर माहिती द्यायच्या. आणि सांगायच्या, की हे पुस्तकात नाहीये, परीक्षेला पण येणार नाही पण मी सांगते. पण गम्मत म्हणजे मला तरी या अवांतर गोष्टीच स्पष्टपणे लक्षात राहायच्या.  मी शाळेत असतानाच त्यांनी मला श्रीधर काणे बद्दल सांगि...

भिडे सर

Image
 भिडे सर  स्पष्ट आणि सानुनासिक आवाज, स्पष्ट विचार, शिकवायची अतिशय off बीट पद्धत, विद्यार्थ्यांबद्दल अतोनात  प्रेम म्हणजे आमचे भिडे सर. पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगतो, सुस्पष्ट विचार.  अकरावी बारावी ला त्याच्याकडून शिकलेले धडे इंजिनिअरिंग तर सोडाच, आज पण विसरलो नाहीये.  कुठलीही गोष्टीची क्लॅरिटी हवी असेल तर मी अजूनसुद्धा भिडे सरांची आठवण काढतो. आणि मग आपल्यापुढचा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.  आणखी एक गोष्ट म्हणजे भिडे सरांचा विद्यार्थ्यांबद्दलचा शाळा संपल्यानंतरचा दृष्टिकोन. ते म्हणतात शाळेतून बाहेर पडलात की तुम्ही माझे मित्र आहात. आणि तसेच वागतात. हा माझा आणि इतर सगळ्यांचा अनुभव आहे.  माझे जे काही ब्लॉग्स झाले, ठाण्याबद्दल, शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल... आणि आता मो ह विद्यालयाची ७८ची बॅच जे अनियतकालिक काढणार आहे त्याचा स्टार्टींग पॉईंट म्हणजे भिडे सर.  अजून काय लिहिणार. फार काही लिहिलं तर सानुनासिक स्वरात सांगतील, "दातार, हे लिहिलंस हे खूप झालं, आपलं लिखाण स्वान्तसुखाय असावं".  मासिकाकरता सरांकडून प्रो...

विलास जोशी सर

 विलास जोशी सर  आमचे विलास जोशी सर म्हणजे एकदम रुबाबदार. सरांची प्रत्येक गोष्ट म्हणजे टापटीप या शब्दाची व्याख्याच. सरळच सांगायचं तर सर एकदम हिरो होते. शिकवणं पण अतिशय व्यवस्थित आणि टापटिपीचं. मला अजून त्यांची कडक इस्त्री केलेली पॅन्ट (ती गॅबर्डीनची होती का?) आठवते. ते शाळेत तर होतेच, शिवाय उदय पाध्येंच्या घरी क्लास होता तिथे पण शिकवायचे, आणि नंतर आमच्या काही जणांकरता त्यांनी घरी लायब्ररी चालू केली होती तेव्हा तर घरीच भेटायचे.  पण ही नंतरची गोष्ट झाली.  सुरुवातीला मला वाटतं सर कळव्याला राहायचे. तिथून सायकलनी शाळेत यायचे. तेव्हासुद्धा आजूबाजूला चिटपाखरू सुद्धा नसलं तरी सर वळताना हात दाखवणार म्हणजे दाखवणारच. हो आणि त्यावेळेला ठाण्यात चिटपाखरू सुद्धा नसेल अशा वेळा असायच्या. हल्ली मला वाटतं पहाटे ४.०० ते ४.०१ पर्यंत थोडीशी शांतता असते असा  प्रवाद आहे.  नंतर सरांनी उदय पाध्येंच्या (म्हणजे  पाध्ये बाईंच्या) घरासमोर नवीन फ्लॅट घेतला. मग त्यांची सायकल बंद झाली. या नव्या घरात असताना त्यांचं लग्न झालं. मग मुलाला कडेवर घेऊन पुष्कळदा दिसायचे. या नवीन घरातच त्यांची ...

सरस्वती: आहे मनोहर तरी!

सरस्वती: आहे  मनोहर तरी!  विदर्भ साहित्य मंडळाने दिलेला पुरस्कार प्रसिद्ध कवी श्री यशवंत मनोहर यांनी नाकारला! बर नाकारला तर नाकारला, मला नको बुवा तुमचा पुरस्कार असं पहिल्यांदाच सांगितलं असतं तर शांतपणे तो दुसऱ्या कोणालातरी देता आला असता (माझं नावही त्या यादीत होतं, जरा खाली होतं, पण होतं... जाऊदे). पण तसं काही न होता तो जाहीररीत्या नाकारला. आणि मग त्यावर मोठीच खळबळ उडाली (किंवा खळबळ उडून राहिली आहे). माझ्या मते तो पुरस्कार मला देता आला नाही ही यातली सगळ्यात खळबळजनक गोष्ट, पण असो.  आणि यामध्ये त्यांनी खुद्द सरस्वतीला ओढलं. म्हणजे गुप्त झालेली नदी नव्हे, खरीच. शाळेत असताना पाटीवर काढतो तीच.  मग मी जाऊन त्यांची मुलाखत बघितली. तर गम्मत म्हणजे त्या मुलाखतीत मुख्य मुद्द्याला हातच घातला नाहीये. स्वतःची प्रतिमा काय आहे यावर बरीच चर्चा आहे (प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट म्हणतात ती हीच का?). शिवाय स्वतःची तब्येत, खाणं/पिणं. आणि पिणं नाहीच, कारण मला काहीही व्यसन नाही असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे (पुरस्कार परत करणे हे व्यसन असू शकतं का, एक शंका).  न पिणारा एकमेव साहित्यिक ...

मी, ऑर्गन आणि राजीव परांजपे

मी, ऑर्गन आणि राजीव परांजपे  कलादशक  च्या वेळेला मंजुषाचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, साथीला राजीव परांजपे आणि मयंक बेडेकर (इंदूरचा young तबलजी) असे होते. त्यावेळेला साथीला ऑर्गन का घेऊ नये असा विचार मी आणि आनंद (आनंद कर्वे) दोघांनी केला. राजूशी बोललो तर तो म्हणाला की तुला सॅन फ्रँसिस्को मध्ये ऑर्गन भाड्यानी मिळेल. एक दिवस आधी मी आणि आनंद जाऊन घेऊन आलॊ. ती जागा म्हणजे एक नॉन डिस्क्रिप्टिव्ह भाग! पूर्वी जिथे सॅन फ्रांसिस्को फोर्टी नायनर्स खेळायचे, किंवा जायंट्स खेळायचे त्या स्टेडिअमजवळ बऱ्यापैकी बकाल वस्तीत ते गराज सदृश्य स्थळ होतं. ऑर्गन कसा उघडायचा हे पण माहिती नव्हतं. राजू म्हणाला की तुला पेटी खोक्यातून काढून स्टेजवर ठेवायला जितका वेळ लागतो तितकाच ऑर्गन उघडायला लागतो.  प्रोगॅम ५ वाजता. त्याच दिवशी सकाळी मी राजू, मंजुषा आणि मयंकला सॅन होसे एअरपोर्ट वरून ११ वाजता घरी घेऊन आलो. राजीव परांजपे हे ऑर्गन आणि हार्मोनियम क्षेत्रातलं मोठं नाव. वाजवणे याच बरोबर ऑर्गन आणि पेट्या बांधणे याची पुरेपूर माहिती. आता आपल्याला कोकणातले बाळ दाते हे ऑर्गन बनवणारे म्हणून माहिती आहेत. पण राजू गेल...

मला न समजलेली अमेरिका

मला न समजलेली अमेरिका  भिडे सरांनी मला हा विषय सुचवला, म्हणून लिहायचं धाडस करतोय.  एक जुनी गोष्ट आहे, गाणं शिकणाऱ्या बायकोला नवरा सांगतो की तू गाण्याऐवजी पेटी का नाही शिकत. कारण पेटी बेसुरी होत नाही! त्याचप्रमाणे सरांना असंही वाटलं असेल की हा फारच ठाण्याबद्दल लिहितोय तर त्यापेक्षा अमेरिकेबद्दल लिहिलं तर जरा बरं लिहील!  पण जेव्हा मी विचार करायला बसलो, की काय लिहू, तेव्हा मला फक्त मथळा सुचला. "मला न समजलेली अमेरिका". आजकाल एखाद्या महिन्याच्या टूरिस्टी अनुभवावर लेख लिहायची प्रथा आहे. पण ३० वर्ष राहूनही मला अमेरिका समजली आहे का? उत्तर सोपं आहे, "नाही".  माझ्यासारखे लोक जेव्हा येतात, तेव्हा ते प्रामुख्याने शहरात किंवा उपनगरात राहतात. हा एक मोठा बबल आहे. आपण जेव्हा म्हणतो की हिंदुस्थानामध्ये इंडिया आणि भारत असे दोन देश आहेत. त्याचप्रमाणे अमेरिकेत शहरी आणि ग्रामीण असे दोन देश आहेत. शहरी भाग प्रामुख्याने डेमोक्रॅटिक आहे, उरलेला रिपब्लिकन आहे. धर्माचा पगडा भरपूर आहे, विशेषतः ग्रामीण अमेरिकेत. वर्णद्वेष आहेच आहे. त्याच प्रमाण शहरात खूपच कमी आहे, किंवा जवळ जवळ नाहीच. ग्रामीण भ...