Posts

पंडितराव बाई

  पंडितराव बाई  हे शीर्षक बघितल्यावर काहीतरी चुकतंय का असं वाटू शकेल! पण नाही. नी गो पंडितराव सर सगळ्यांना माहिती आहेत. ठाण्यामधले जे जुने किंवा नवीनसुद्धा लोक, मुलं आहेत त्यांना नी गो पंडितराव वक्तृत्व स्पर्धा माहिती असतीलच. ही स्पर्धा महाराष्ट्रात सुद्धा माहिती आहे. पंडितराव बाई म्हणजे नी गो पंडितराव यांच्या पत्नी. स्वतः पंडितराव सर म्हणजे अस्सल शिक्षक, शिवाय तापटही. मी स्वतः त्यांना पाहिलं नाही. ते अतिशय लोकप्रिय होते, कडक होते, आदरणीय होते (आणि आहेत) आणि ते शिकवतानाच गेले. एव्हढंच माहिती.  मला पंडितराव बाई माझ्या तिसरीत भेटल्या, आणि नंतर मी आणि माझे वर्गमित्र यांच्या आयुष्याच्या भाग बनून गेल्या. माझे वर्गमित्र म्हणजे मनोज वाकडे, श्रीकांत राजे, दिलीप लोंढे, संतोष ताम्हणे इत्यादी.  आमची शाळा, बेडेकर विद्या मंदिर. बाई तिथे मागेच मांडवीकर वाडीत राहायच्या. आता तिथे "रावण गर्वहर द्विभुज" गणपती मंदिर आहे. बाई अतिशय प्रेमळ, विद्यार्थ्यांविषयी कळकळ, शांत, हसतमुख. त्या रागावलेल्या मला काही आठवत नाहीत.  आमची तिसरी सुटली, चौथी सुटली, मग आम्ही सर्व जण मो ह विद्यालयात गेल...

चारचौघे

  चारचौघे सर्व प्रथम म्हणजे अनिल दादाचं अभिनंदन. पंच्याहत्तरी बद्दल. शिवाय अर्चना वहिनीचं पण. त्याच्या ७५  वर्षात तिचा पन्नास तरी वर्षांचा वाटा आहे. अनिल दादाला सांभाळणं ही कर्मकठीण गोष्ट तिने करून दाखवली आहे!  मी लिहायला बसलो तेव्हा लक्षात आलं की आम्ही चार भाऊ. मी, अनिल दादा, अरविंद दादा, आणि सुनील दादा. अर्थात अरविंद दादा आता आपल्यात नाही. पण त्याची आठवण अपरिहार्य आहेच. त्यांना अप्पा (अरविंद दादा) आणि अण्णा (अनिल दादा) अशी पण नावं होती. माझ्या बाबतीत बोलायचं म्हणजे मी मधल्या पिढीचा. त्यामुळे लहान असताना या तिन्ही भावांकडून भरपूर लाड झाले. मला आठवतंय, मला पहिली मस्तानी अनिल दादांनी खाऊ घातली. तीसुद्धा एकदम ऑथेंटिक. सदाशिव पेठ, निंबाळकर तालमीच्या जवळ. त्याचबरोबर माझा पहिला ७०  mm सिनेमा, शोले, तो पण अनिल दादाबरोबर पाहिला. मी जेमतेम शाळकरी, त्यामुळे मी पैसे खर्च करायचा प्रश्नच नव्हता. अनिल दादा नेहेमीप्रमाणे मला स्कुटर वर बसवून नटराज टॉकीज मध्ये घेऊन गेला. आणि इथेच थांब म्हणाला. मी तो पर्यंत बाल्कनीत कधीच बसलो नव्हतो. अर्थात हल्ली मॉल च्या जगात बाल्कनी, ड्रेस स्टॉल, ब...

आमचे तामरस सर

 आमचे तामरस सर  आमच्या नशिबामुळे आम्हाला नववी, दहावी ,  अकरावी आणि बारावी ला असे शिक्षक लाभले की त्यामुळे आमचं आयुष्य घडलं. चितळे सर, विलास जोशी सर, खोल्लम सर, भिडे सर, पटवर्धन बाई आणि तामरस सर ही अग्रेसर नावं. १० वी ला गणित आणि शास्त्र हे विषय इंग्लिश माध्यमातून शिकवावे हा प्रकार आम्ही ९ वीत असताना अमलात आला. पण अर्थातच एकदम १० वी ला हे अशक्य आहे. म्हणून आठवीपासून सुरवात करायची होती. पण आम्ही नववीत. पण तरीही आम्ही तो पर्याय निवडला. म्हणूनही कदाचित असेल, पण आमच्या बॅच ला शिक्षकांचं प्रेम जास्तीच मिळालं. तामरस सर फिजिक्स आणि गणित शिकवायचे.  तामरस सरांचा अमृत महोत्सव ही कल्पनाच मी करू शकत नाही. ते एव्हरग्रीन आहेत. सर म्हणजे शिस्त, सर म्हणजे चटपटीतपणा, सर म्हणजे भराभर आणि परफेक्ट शिकवणं, सर म्हणजे टापटीप. आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून आदर. फक्त आदर, भीती अजिबात नाही. आजही ते खडू उचलून "assume this is a straight line" असं म्हणून फळ्यावर एक लाईन काढतील आणि शिकवायला सुरुवात करतील असंच वाटतं. ती तथाकथित सरळ लाईन कधीच सरळ आली नाही ही गोष्ट वेगळी! पण assume असं म्हणून स...

यमन

माझं एक स्वप्न आहे. ते पूर्वी खूप वेळा साकार झालं आहे, पण तरीही अजूनही ते स्वप्न आहेच  कारण आता ते साकार व्हायची शक्यता कमीच आहे.  पावसाळ्याचे दिवस असावेत. साधारण गुरु पौर्णिमेच्या वेळेचे. साडे नऊचा प्रोग्रॅम. जेवण करून आरामात सगळे लोक यावेत. सभागृहाच्या दारावरच कोणीतरी अत्तरदाणी घेऊन उभं असावं. पानाचं तबक फिरत असावं. त्यात पान, सुपारी, कात, लवंग आणि चुना. बास. आमच्या लहानपणी तंबाखू त्यात नसायची. ती डबी मोठे लोक आपापली ठेवायचे. मी अत्तरही लावून घेत नाही, किंवा पानही खात नाही. अजूनसुद्धा. पण अत्तरदाणी आणि तबक असल्याशिवाय कार्यक्रम होतो हेच पटू शकत नाही.  कोणीतरी तब्येतीत गाणारा गायक/गायिका असावी. तबल्यावर सुंदर ठेका देणारा, नेहेमीचा तबलजी. आणि ट्रबलजी नव्हे! संयत साथीची संवादिनी. छोटा विस्तार करून, विलंबित एकतालातली बंदिश चालू व्हावी. एक सुंदर तुकडा घेऊन तबलजीने सम द्यावी.  आणि शांतपणे यमन चालू व्हावा.  आमच्या लहानपणी हे कित्येक वेळा अनुभवलं आहे. पण आता तो माहौल नाही. कोरोना आत्ता आहे, पण तो जाईल. परंतु त्याही आधी सेक्युरिटी मुळे रात्रीचे कार्यक्रम बंद झाले. अजून...

MH Blog Trial

Image
 

पटवर्धन बाई

 पटवर्धन बाई  त्यांचा विषय बायोलॉजी. मला पहिली संधी मिळाल्या मिळाल्या मी तो सोडला! अर्थात तो त्यांच्यामुळे नव्हे. कारण त्यांचं शिकवणं होतं म्हणून पासापुरते मार्क मिळू शकत होते. परंतु सेल, बेडूक (पुलंचे  रावसाहेब जसा प्राचीला गच्ची शोधत होते, त्याप्रमाणे बेडूकला हाडूक हे यमक बरोबर जमेल!), मेम्ब्रेन, प्लाझ्मा, मायटोकोण्ड्रिया, न्यूक्लिअस  आणि अनंत न कळणाऱ्या गोष्टी या विषयात होत्या. यात आपण काहीही करू शकणार नाही (नापास होणं मात्र जमेल) ही खात्री पटल्यामुळे मी मुकाटपणे टेक्निकलला प्रवेश घेतला.  त्यांचा विषय सोडल्यामुळे असेल कदाचित, पण मी त्यांचा आवडता होतो हे निश्चित.  अतिशय हसतमुख, प्रसन्न व्यक्तिमत्व. शिकवायची उत्तम हातोटी, चपखल उदाहरणं आणि विद्यार्थ्यांशी सहज संवाद म्हणजे पटवर्धन बाई. मला आठवणारी एक गोष्ट म्हणजे पिरिअड संपताना बाई अवांतर माहिती द्यायच्या. आणि सांगायच्या, की हे पुस्तकात नाहीये, परीक्षेला पण येणार नाही पण मी सांगते. पण गम्मत म्हणजे मला तरी या अवांतर गोष्टीच स्पष्टपणे लक्षात राहायच्या.  मी शाळेत असतानाच त्यांनी मला श्रीधर काणे बद्दल सांगि...

भिडे सर

Image
 भिडे सर  स्पष्ट आणि सानुनासिक आवाज, स्पष्ट विचार, शिकवायची अतिशय off बीट पद्धत, विद्यार्थ्यांबद्दल अतोनात  प्रेम म्हणजे आमचे भिडे सर. पुनरुक्तीचा दोष पत्करून पुन्हा सांगतो, सुस्पष्ट विचार.  अकरावी बारावी ला त्याच्याकडून शिकलेले धडे इंजिनिअरिंग तर सोडाच, आज पण विसरलो नाहीये.  कुठलीही गोष्टीची क्लॅरिटी हवी असेल तर मी अजूनसुद्धा भिडे सरांची आठवण काढतो. आणि मग आपल्यापुढचा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो हे मी प्रत्यक्ष अनुभवलेलं आहे.  आणखी एक गोष्ट म्हणजे भिडे सरांचा विद्यार्थ्यांबद्दलचा शाळा संपल्यानंतरचा दृष्टिकोन. ते म्हणतात शाळेतून बाहेर पडलात की तुम्ही माझे मित्र आहात. आणि तसेच वागतात. हा माझा आणि इतर सगळ्यांचा अनुभव आहे.  माझे जे काही ब्लॉग्स झाले, ठाण्याबद्दल, शाळेबद्दल, शाळेतल्या शिक्षकांबद्दल... आणि आता मो ह विद्यालयाची ७८ची बॅच जे अनियतकालिक काढणार आहे त्याचा स्टार्टींग पॉईंट म्हणजे भिडे सर.  अजून काय लिहिणार. फार काही लिहिलं तर सानुनासिक स्वरात सांगतील, "दातार, हे लिहिलंस हे खूप झालं, आपलं लिखाण स्वान्तसुखाय असावं".  मासिकाकरता सरांकडून प्रो...